पीच फेस्ड आफ्रिकन लव्ह बर्ड

शास्त्रीय नाव: अॅगापोर्निस रोसिकॉलिस

रोझी-फेस्ड लव्ह बर्ड पक्षी रोझी-कॉलर्ड किंवा पीच-फेस्ड लव्ह बर्ड म्हणून ओळखले जात असून, नामिब वाळवंट अशा नेऋत्य आफ्रिकेतील रूक्ष भागात या लव्ह बर्डचा मूळ अधिवास आहे. हे पक्षी जितके सुंदर आहेत तितकेच लोकप्रिय असून, पीच-फेस्ड लव्ह बर्ड्स त्यांचे व्यक्तिमत्व व आकर्षक पिसारा यामुळे “अॅनिमल मॅग्नेटिझम” दर्शवतात. पाळीव पक्षी म्हणून ते उत्तम आहेत. एकटे किंवा जोडीने घेतले तरी घरामध्ये प्रसन्न चिवचिवाट व मनोरंजन सुरू असते.

नेहमी दक्ष व खोडकर असलेले पीच-फेस्ड लव्ह बर्ड म्हणजे चांगले एस्केप आर्टिस्ट आहेत आणि नेहमी खेळण्यासाठी तयार व उत्साही असतात. जोडीने ठेवले तर हे पक्षी वैवाहिक जीवनाचा आनंद घेतात. एकटे ठेवले व सातत्याने लक्ष दिले तर हे लव्ह बर्ड मालकाच्या कुटुंबावर खूप प्रेम करतात. त्यांच्याकडे काही आठवडे जरी दुर्लक्ष केले तरी ते चिडखोर होतात. पीच फेसचा आवाज इतकाही भयानक नसतो, पण सकाळी, संध्याकाळी व आनंदी असताना शिट्या वाजवण्याची व चिवचिवाटाची सवय त्यांना असते.